कराड

कराडच्या बाजारात महागाईचा ‘श्रीं’ना फटका; गणेशमूर्तींच्या किंमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढ

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कराडच्या बाजारपेठेत विविध रूपांतील आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, यंदा बाप्पाच्या भक्तांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार असून, गणेशमूर्तींच्या किंमतीत सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाचे गगनाला भिडलेले दर, रंग-सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च आणि मजुरीतील वाढ यामुळे गणेशमूर्ती घडवणे

एस. एस. मोबाईल शॉपी चोरी प्रकरणी दोघांना कर्नाटकातून अटक : कराड शहर पोलिसांची दमदार कामगिरी 

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  : कराड शहरातील एस एस मोबाईल शॉपीचे शटर तोडून सुमारे ३० लाख रुपये किमतीचे मोबाईल संच चोरून नेणाऱ्या टोळीतील दोघांना कराड शहर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कर्नाटकातील वस्कोटी, जि. बंगळूर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री दोनच्या सुमारास एस

तब्बल 350 फुटी तिरंग्याने कराड झाले तिरंगामय

  पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  : देशभक्तीच्या उत्साहाने भारलेल्या वातावरणात कराडमध्ये गुरुवारी भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. रॅलीचे मुख्य आकर्षण ठरलेला तब्बल 350 फूट लांब तिरंगा ध्वज हजारो नागरिकांनी एकत्रितपणे हातात घेतला. ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘वंदे मातरम्‌‍‌’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे या तिरंगा रॅलीत सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी एकजुटीने सहभागी होत

आरक्षणासाठी मराठ्यांची ही शेवटची आरपारची लढाई; पाचवड येथे मनोज जरांगे पाटील यांची डरकाळी

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचवड : “गेली अनेक वर्षे आपण ज्या राजकीय नेत्यांना मते देऊन मोठे केले, त्यांनी मराठा समाजाचा कधीही मनापासून विचार केला नाही. त्यामुळे इथून पुढे जो लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याच पाठीशी मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी इतर कोणाच्याही

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये बिबट्याचा मृत्यू – तासवडे एमआयडीसीतील घटना

पांचगणी न्यूज नेटवर्क उंब्रज : तासवडे एमआयडीसीतील महावितरणच्या विद्युत सबस्टेशनमध्ये विद्युत यंत्रणेवर उडी मारल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 29) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, औद्योगिक क्षेत्रात बिबट्यांचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. पहाटे अचानक सबस्टेशनमध्ये जोरदार स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला.

शामगावात कृत्रिम म्हशीचे दूध बनविणाऱ्या दाम्पत्याच्या कारखान्यावर धाड एफडीएची कारवाई; पामोलीन तेल, संशयित पावडरसह साहित्य जप्त

  पांचगणी न्यूज नेटवर्क मसूर  ः तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज आणि तडफदार प्रशासकीय कार्यशैलीची आठवण करून देणारी कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने कराड तालुक्यात प्रथमच दूध भेसळीविरोधात मोठा धडक छापा टाकला. शामगाव (ता. कराड) येथील एका घरात कृत्रिम म्हशीचे दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले असून, भेसळीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नीटमध्ये अपयश; नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या : विषारी औषध प्राशनानंतर उपचारादरम्यान मृत्यू; शेरे परिसरात हळहळ

पांचगणी न्यूज नेटवर्क मसूर  ः नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून कराड तालुक्यातील शेरे स्टेशन येथील १८ वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी (दि. २७) तिचा मृत्यू झाला.   समीक्षा दीपक पवार (वय १८, रा. शेरे स्टेशन, ता. कराड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे खरंतर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्वीकारला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

नीट पेपरफुटी, लाठीचार्ज विरोधात कराडात युवक युवतींचे एक दिवसीय आंदोलन

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कराडमध्येही उमटले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत शुक्रवारी कराडातील महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.   यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवक

कराडात वकिलांकडून एकदिवस काम बंद ठेऊन ‘जंतर-मंतर’वरील लाठीमारीचा निषेध!

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : नीट परीक्षा गैरव्यवहार, शिक्षणातील अनियमितता आणि इतर मागण्यांसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे मोर्चातील हजारो विद्यार्थी-तरुणांवर पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधाचे कराडात देखील पडसाद उमटले. बुधवारी कराड बार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण एक दिवस काम बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनच्या

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers