
पाचगणीत मलवाहिनीची ‘गटारगंगा’ मुख्य रस्त्यावर; शिवाजीनगर परिसरातील नागरिक व पर्यटक हैराण ; दुर्गंधीमुळे साथीच्या आजारांची भीती, कायमस्वरूपी उपायाची मागणी
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटननगरीला सध्या अस्वच्छतेचा मोठा फटका बसत आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरातील बेल एअर हॉस्पिटल ते बेबी पॉईंट या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलच्या मलवाहिनीच्या चेंबरमधून मैला आणि सांडपाणी थेट रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही अक्षरशः नाक











