पांचगणी

देशी गोवंश कत्तलीला देण्यापेक्षा गोशाळेत दान करा; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांचा स्तुत्य पुढाकार! वेळे येथील ‘करुणा मंदिर’मध्ये गोवंश सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी, ता. ३ : “देशी गोवंश कत्तलीसाठी देण्यापेक्षा तो गोशाळेत दान केला पाहिजे. गाईचे रक्षण केल्याने मिळणारे पुण्य अगाध आहे,” असा संदेश पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. याच विचारधारेतून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी पुढाकार घेत देशी गोवंश वेळे (ता. वाई) येथील ऐतिहासिक ‘करुणा मंदिर’ गोशाळेत दान करत एक आदर्श वस्तुपाठ घालून

स्वरा एन्टरप्रायजेस व राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंचाचा स्तुत्य उपक्रम; रुईघर, शिंदेवाडी व गणेशपेठ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी  : शिक्षणाशिवाय माणसाचा विकास अधुरा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्दीने व आत्मविश्वासाने शिक्षण घेतले पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वरा एन्टरप्रायजेसने आपल्या व्यवसायातील काही रक्कम वापरून दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबवून समाजासाठी खारीचा वाटा उचलण्याचे अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा

जर्मन-फ्रेंच भाषेत पाचगणीचा झेंडा; विद्या निकेतनच्या ११ विद्यार्थ्यांचा पुण्यात राज्यस्तरीय गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आंतरराष्ट्रीय भाषांचे ज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड क्षमता असते, हे पाचगणीतील विद्या निकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर्मन व फ्रेंच भाषा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत शाळेच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात आपल्या यशाचा डंका वाजवला. ​शाळेचे मुख्याध्यापक अथर्व बिरामणे व

पाचगणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. ​या प्रसंगी पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, नगरसेवक प्रकाश गोळे, नगरसेवक आकाश बगाडे, शशिकांत मोहिते, सुनंदा मोरे, नूतन

गोडवलीत पावसाच्या तांडवाने शेतजमीन पुन्हा खचली; तपनेश्वर मंदिराशेजारील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पाचगणी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार आणि मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. या संततधार पावसामुळे पाचगणी शहराच्या अगदी जवळच असलेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची ऐतिहासिक जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे.   गावातील प्रसिद्ध

आरोग्यसेवेतील हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही; नवनिर्वाचित अध्यक्ष संजय केळघणे यांचा थेट इशारा; पहिल्याच बैठकीत कडक अंमलबजावणीचे आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : “नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामीण भागातील एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहता कामा नये, यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेने पूर्ण जबाबदारीने काम केले पाहिजे. रुग्णांच्या जीवाशी खेळणारा किंवा रुग्णसेवेत जरासाही निष्काळजीपणा दाखवणारा कर्मचारी असो वा अधिकारी, त्यांचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही.

पेपरफुटी प्रकरणाचा पाचगणीत भव्य कॅण्डल मार्च व निषेध रॅलीद्वारे तीव्र धिक्कार; मृत विद्यार्थ्यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी  : राज्यात गाजत असलेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे निराशेपोटी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पाचगणी येथे सर्वपक्षीय संघटना, युवक, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य निषेध रॅली आणि कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात संपूर्ण शहर या रॅलीच्या माध्यमातून एकवटल्याचे पाहायला मिळाले.

उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पांचगणीच्या ज्ञानगंगा हायस्कूलची गगनभरारी; मरियम पटेल व अथर्व भिलारे यांच्या यशाने शिरपेचात मानाचा तुरा!

पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावणाऱ्या पाचगणी येथील नामांकित ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) पुन्हा एकदा आपल्या यशाचा डंका वाजवला आहे. या अत्यंत मानाच्या व कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी मरियम असिफ पटेल आणि अथर्व किरण भिलारे यांनी दैदिप्यमान यश संपादन करत शाळेच्या उज्ज्वल गुणवत्तेची परंपरा

मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात गोडवलीच्या अरुण मालुसरे यांचा सन्मान; शिर्के प्रतिष्ठानतर्फे ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार-२०२६’ प्रदान!

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक, कवी व पत्रकार अरुण सखाराम मालुसरे यांच्या बहुआयामी कार्याचा मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव करण्यात आला. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मानाचा ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार-२०२६’ अरुण मालुसरे यांना मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. ​दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे यांना समर्थ सातारा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. मुंबईतील दहिसर येथील लता मंगेशकर हॉलमध्ये रविवारी (ता. २ ऑगस्ट) सकाळी १० वाजता आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून