पांचगणी

मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात गोडवलीच्या अरुण मालुसरे यांचा सन्मान; शिर्के प्रतिष्ठानतर्फे ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार-२०२६’ प्रदान!

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : सामाजिक, साहित्यिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक, कवी व पत्रकार अरुण सखाराम मालुसरे यांच्या बहुआयामी कार्याचा मुंबईत राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव करण्यात आला. शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मानाचा ‘सर्वोत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार-२०२६’ अरुण मालुसरे यांना मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. ​दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे यांना समर्थ सातारा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. मुंबईतील दहिसर येथील लता मंगेशकर हॉलमध्ये रविवारी (ता. २ ऑगस्ट) सकाळी १० वाजता आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून

पांचगणीच्या राजकारणातील ‘वादळी’ पर्व : माजी उपनगराध्यक्ष सचिन भिलारे

पांचगणी न्यूज नेटवर्क ​”परिस्थिती कितीही खडतर असली तरी इरादे ज्यांचे पोलादी असतात, लोकांच्या हृदयात राज्य करणारी माणसे काळजाचा ठोका बनून राहतात!” ​पांचगणीच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ज्या नावाने एक वेगळाच दरारा निर्माण केला, अन्यायाविरोधात नेहमी छातीठोकपणे उभे राहिले आणि ज्यांच्या आक्रमक, तडफदार कार्यशैलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजेच पांचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री.

तायघाटचा सुपुत्र सुहास भिलारे ठरला गावातील पहिला वकील! एलएलबी परीक्षेत घवघवीत यशाबद्दल शिवसेना व ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

पांचगणी न्यूज नेटवर्क ​भोसे  : दुर्गम व निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या तायघाट (ता. महाबळेश्वर) या छोट्याशा गावातील गुणी सुपुत्र सुहास भिलारे याने एलएलबी (LLB) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. तायघाट गावातील पहिला वकील होण्याचा मान पटकावून सुहासने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिवसेना आणि परिसरातील ग्रामस्थांच्या

पाचगणीतील टेबललँडवर हरित क्रांतीचा ध्यास! गुहेतील कर्मचारी, वनविभाग अन् पर्यटकांच्या संयुक्त पुढाकारातून ‘सीडबॉल’ अभियान यशस्वी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : निसर्गाची मुक्त उधळण लाभलेल्या पाचगणी येथील जगप्रसिद्ध टेबललँड पठारावर पर्यावरण संवर्धनाची एक नवी आणि अतिशय स्तुत्य गुंफण पाहायला मिळाली. टेबललँडवरील प्रसिद्ध प्राचीन गुहा परिसरातील जंगलात असलेल्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पायवाटेच्या दुतर्फा हरित संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गुहेतील कर्मचारी, वनविभाग आणि पर्यटकांनी एकत्र येत भव्य ‘सीडबॉल’ अभियान यशस्वीरीत्या राबवले. प्रत्यक्ष कृतीतून निसर्गरक्षणाचा वसा

महाबळेश्वर-पाचगणीतील अनधिकृत बांधकाम नोंदणी बंदीचा निर्णय अन्यायकारक; महसूल मंत्र्यांकडे दाद मागणार : राजेंद्र शेठ राजपुरे

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह) महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील गावठाण हद्दीबाहेरील बांधकामांच्या नमुना ८-अ मधील नोंदींवर प्रशासनाने लादलेली बंदी पूर्णपणे अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमीपुत्रांचे जगणे आणि हक्काचे छत्र उभारणे कठीण झाले असून, ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी भीषण परिस्थिती स्थानिक नागरिकांवर ओढावली आहे, अशा शब्दांत सातारा जिल्हा

महाबळेश्वर-पाचगणीतील अनधिकृत बांधकाम नोंदणी बंदीचा निर्णय अन्यायकारक; महसूल मंत्र्यांकडे दाद मागणार : राजेंद्र शेठ राजपुरे

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह) महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील गावठाण हद्दीबाहेरील बांधकामांच्या नमुना ८-अ मधील नोंदींवर प्रशासनाने लादलेली बंदी पूर्णपणे अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमीपुत्रांचे जगणे आणि हक्काचे छत्र उभारणे कठीण झाले असून, ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी भीषण परिस्थिती स्थानिक नागरिकांवर ओढावली आहे, अशा शब्दांत सातारा जिल्हा

पाचगणी पोलिसांनी नागरिकांचे ‘हरवलेले मोबाईल’ अन् ‘सायबर फ्रॉडचे पैसे’ मिळवून दिले; २५ मोबाईलसह १.५ लाख रुपये परत!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पाचगणी पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरातील २५ नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पुन्हा मिळाले आहेत, तर सायबर फ्रॉडमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या अर्जदारांना तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात असून, पोलीस प्रशासनाचे

ॲस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न; विद्यार्थ्यांची बालदिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू!

पाचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : अमर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संचलित येथील प्रसिद्ध ॲस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीचा पावन उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मांगल्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठूरायाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी अमर

आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये दिमाखदार वारी सोहळा; विद्यार्थ्यांसह पालक-शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग

पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी :  आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भव्य वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांपासून शिक्षक आणि पालकांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून