महाबळेश्वर

उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्पर्धेत महाबळेश्वरच्या कृष्णा पवारची सुवर्णकामगिरी! ५२ किलो वजनी गटात पटकावले सुवर्ण पदक

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : कडवी आव्हाने, तीव्र स्पर्धा आणि जिद्दीच्या जोरावर महाबळेश्वरच्या कन्या कु. कृष्णा प्रमोद पवार हिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याचा डंका वाजवला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय विशेष ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘राष्ट्रीय सीनियर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात अफाट कामगिरी करत कृष्णाने सुवर्ण पदकावर

निसर्गाच्या कुशीत जपला प्रामाणिकपणा! १.५ लाखांची रोकड अन् मोबाईल असलेली दिल्लीच्या पर्यटकाची बॅग महाबळेश्वर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर: थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरात ख्याती असलेल्या महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्यासोबतच येथील लोकांच्या प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावर १ लाख ५० हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गहाळ झालेल्या दिल्ली येथील पर्यटकाला महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ती सुरक्षितपणे परत करत प्रामाणिकपणाचा

बिरवाडीचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला; प्रा. श्रीकांत घाडगे ‘नॅशनल टीचर अवॉर्ड’ने सन्मानित

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर :  सप्टेंबर अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना समृद्ध करणारे बिरवाडी (ता. महाबळेश्वर) येथील सुपुत्र प्रा. श्रीकांत तुकाराम घाडगे यांना प्रतिष्ठित ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ने गौरविण्यात आले आहे. पुणे येथील नामांकित ‘ग्लोबल एलिट (मीडिया अँड टेक)’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी

महाबळेश्वर येथील प्राचीन श्री स्वयंभू देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी ‘ड्रेस कोड’ लागू करा! शिवसेना महिला वाई विधानसभा समन्वयक यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील अतिप्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या श्री स्वयंभू शंकर महादेव, अतिबलेश्वर आणि पंचगंगा कृष्णामाई मंदिरांचे धार्मिक पावित्र्य व भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पूर्ण आणि सात्विक पोशाख (ड्रेस कोड) सक्तीचा करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना महिला वाई विधानसभा समन्वयक सौ. वर्षा किरण आरडे यांनी

सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत चिखली शाळेचा डंका; मीत जाधव महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली (ता. महाबळेश्वर) येथील गुणवंत विद्यार्थी मीत विजय जाधव याने उत्तुंग यश संपादन केले आहे. मीतने गुणवत्ता यादीत स्थान मिळवत संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या व गावाच्या वैभवात मोलाची

मेटगुताड येथील हॉटेलात ओल्या जिन्यावरून घसरून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; केळघरवर शोककळा

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर,: पर्यटनाचा हंगाम आणि जोरात सुरू असलेल्या परतीच्या पावसात महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मेटगुताड येथील एका प्रसिद्ध हॉटेलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पावसाने ओलसर झालेल्या जिन्यावरून पाय घसरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. पांडुरंग उर्फ कोंडीबा चव्हाण (वय ४३, रा. केळघर, ता.

शिवसेना महिला आघाडीची धुरा सौ. वर्षाताई आरडे यांच्याकडे; सातारा-जावली उपजिल्हा प्रमुखपदी निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : शिवसेना महिला आघाडीच्या संघटन वाढीसाठी आणि सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी सौ. वर्षाताई किरण आरडे यांची सातारा-जावली उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा आणि जावली तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ​एका विशेष आणि उत्साहपूर्ण सोहळ्यात सौ. वर्षाताई

भोसे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हसू; माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क भोसे : शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना शालेय प्रवासाच्या सुरुवातीलाच योग्य प्रोत्साहन मिळावे या सामाजिक भावनेतून भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विशेष उपक्रम पार पडला. माजी केंद्रप्रमुख तथा शिवसेनेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप

आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पांचगणी न्यूज नेटवर्क ​अलिबाग / पोलादपूर : मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याची टांगती तलवार आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात

महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील १०५ गावांचा वनवास संपला; लालपरी पुन्हा धावली, नवीन वेळापत्रक जाहीर! : नगराध्यक्ष सुनील. शिंदे आणि नगरसेवक ॲड. संजय जंगम यांचे प्रयत्न यशस्वी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर: महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्ता खचल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील १०५ गावांचा महाबळेश्वर तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ता बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि समाजसेवकांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. परिणामी, या भागातील एसटी

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers