पाचगणी लगतच्या तायघाट परिसरात बिबट्याचे दर्शन; अनिकेत बेलोशेंनी मोबाईलमध्ये टिपला व्हिडिओ, नागरिकांमध्ये घबराट
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरालगतच्या तायघाट (ता. महाबळेश्वर) परिसरात रविवारी भल्या पहाटे थेट मानवी वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. तायघाट येथील वाहनतळावर असलेल्या वीज वितरणाच्या डीपीजवळ (DP) रस्त्याकाठीच एक पूर्ण वाढ झालेला बिबट्या संशयितरीत्या वावरताना आढळून आला. स्थानिक नागरिक अनिकेत बेलोशे हे सकाळी…