शॉपिंग सेंटर परिसरातील सुलभ शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन; पाचगणी शहर विकास आघाडीची वचनपूर्ती
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पाचगणी शहरातील मुख्य शॉपिंग सेंटर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सुलभ शौचालयाची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या नवीन सुलभ शौचालयाचा भूमिपूजन समारंभ आज मान्यवरांच्या हाती पार पडला. नगरपरिषदेत सत्ताधारी असलेल्या ‘पाचगणी शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून ही महत्त्वाची वचनपूर्ती करण्यात…