श्री घाटजाई देवस्थानच्या अध्यक्षपदी शेखर कासुर्डे यांची बिनविरोध निवड; पर्यटन स्थळाला साजेसा विकास साधण्याचा संकल्प
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील श्रद्धास्थान व प्रसिद्ध धार्मिक केंद्र असलेल्या श्री घाटजाई देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक तथा श्री घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर (दाजींनाना) कासुर्डे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवड घोषित झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री घाटजाई देवस्थान ट्रस्टचे माजी…