Home » सातारा » भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या निवडी…..

भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या निवडी…..

पांचगणी न्यूज नेटवर्क / अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने यंदाच्या वर्षासाठी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ तेजस्विनीताई घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांची कार्यकारणी जाहीर केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यात नारी शक्तीचा उदय झाला असल्याचे मानण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाने सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्षाच्या कार्यकारणी निवड करून त्यांना संधी दिली आहे. हम भी कुछ कम नही अशा पद्धतीने राजकीय पटलावर काम करणाऱ्या माता-भगिनींनी भाजपच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये विकास कामे करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या कार्यकारणी मध्ये ९ सरचिटणीस आणि ४६ उपाध्यक्ष ४३ चिटणीस, सोशल मीडिया संयोजक पदी दोन आणि कोषाध्यक्षपदी एक, मंडल अध्यक्ष पदी सर्व तालुक्यातील तीन-तीन प्रतिनिधी घेण्यात आलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली या निवडी झालेले आहेत.

जिल्हा कार्यकारणी निवडले असून भाजप जिल्हा अध्यक्ष पदावर असलेले डॉ. अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण मतदार संघात महिला मोर्चाचे कार्यकारणी निवडणूक बाकी आहे .असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सातारा जिल्हा कार्यकारणी मध्ये बहुजन समाजाच्या महिलांना झुकते माप दिलेले आहे. वास्तविक पाहता ३३ टक्के महिला आरक्षण अस्तित्वात आहे .त्यामध्ये पक्ष कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या महिलांची नावे अल्प असून सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रस्थापित घराण्यातील महिलांना संधी दिली जाते. असा सर्वच पक्षाबद्दल आरोप केला जातो. त्यामध्ये आता भाजप अग्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. या निवडीच्या वेळेला भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers