पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : – येथील पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या कॉम्प्युटर व विविध तांत्रिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरू आहे.
पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साइट, ऑटोमोबाइल मेकॅनिक टेक्निशियन टू व्हीलर, फोर व्हीलर मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटार आर्मेचर वाइंडिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एमएस ऑफिस, कॉम्प्युटर मेन्टेनन्स, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर मेकॅनिक, डिप्लोमा इन ऑटोमोबाइल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस इत्यादी तांत्रिक कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
या कोर्सेससाठी पात्रता इयत्ता आठवी। दहावी/ बारावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण अशी असून, महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी, विविध कंपन्या आणि कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनाही प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी व इंग्रजी आहे.
इन्स्टिट्यूटमध्ये शिकवल्या जाणाऱ्या तांत्रिक कोर्सेसच्या शासकीय परीक्षा होतात. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये १०० टक्के नोकऱ्या मिळतात. त्याचबरोबर विविध योजनांतर्गत व्यवसायांसाठी कर्ज मिळते. इलेक्ट्रिकल कोर्स झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वायरमन लायसन्स परीक्षेला बसता येते. एस. एस. रजिस्ट्रेशनसाठी इन्स्टिट्यूटमध्ये मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी एसटी पासेसची सोय असून, विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थांना प्रवेश देण्यात येतो. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थेच्या कार्यालयामध्ये समक्ष भेटावे. विद्यार्थ्यांनी शाळेचा दाखला, दहावी
अथवा बारावी उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक, आठ फोटो, आधारकार्डची झेरॉक्स या कागदपत्रांची पूर्तता करून, प्रवेश अर्ज कार्यालयामध्ये जमा करावेत. माहितीपत्रक व प्रवेश फॉर्मची किंमत १०० रुपये असून मनीऑर्डरने १२५ रुपये पाठवावेत.
अधिक माहितीसाठी संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. सुनीलकुमार पाटील व प्राचार्य सुजीत पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट प्लॉट नं. ११, राधिका रस्ता, एसटी स्टँडजवळ, सातारा येथे संपर्क साधावा. संस्थेच्या कार्यालयाची वेळ सकाळी १० ते ५ आहे.



