
जावळी


वस्तुनिष्ठ बातमीतून समाजहितासाठी पत्रकारितेचा उपयोग होतो. : राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : राज्यातील तरुण पत्रकारांनी घाई गडबडीने बातमी बनवून प्रसिद्ध करू नये तर त्या बातमीची शहानिशा करून बातमी मागची वस्तुस्थिती पाहून ती प्रसिद्धी करून त्यामागची कारणे व मीमांसा तपासून योग्य बातमी झाली तर समाजहितासाठी आपली पत्रकारितेचा आधार व न्याय समाजाला मिळत असून समाज हितासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याची भूमिका असावी

सहा मुदतवाढींनंतरही आनेवाडी टोल नाक्याची दुरवस्था कायम; मंत्री-आमदारांच्या दुर्लक्षामुळे वाहनध
पांचगणी न्यूज नेटवर्क : अजित जगताप, आनेवाडी आनेवाडी : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील (NH 48) जावळी तालुक्यातील आनेवाडी टोल नाका प्रशासकीय ढिसाळपणा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महामार्गावरील उड्डाणपूल, सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) आणि इतर सुरक्षाविषयक प्रलंबित कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कंत्राटदाराला तब्बल सहा वेळा मुदतवाढ

‘काखेला कळसा, गावाला वळसा’; सातारा बसस्थानकाच्या गलथान कारभारावर प्रवासी आक्रमक
दोन वर्षांपासून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांच्या खिशाला डबा; अस्वच्छता आणि सोयी-सुविधांच्या अभावामुळे संतापाची लाट पांचगणी न्यूज नेटवर्क /जितीन वेंदे कुसुंबी : जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र आणि रोज हजारो प्रवाशांचे आश्रयस्थान असलेले सातारा बसस्थानक सध्या प्रशासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थेचे केंद्र बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एसटी प्रशासनाकडून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांवर extra भाड्याचा आर्थिक भुर्दंड

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जावळी तालुका उपाध्यक्षपदी गोपाळ बेलोशे; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
पांचगणी न्यूज नेटवर्क जावळी: बेलोशी गावचे सुपुत्र आणि नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बेलोशे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या जावळी तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी केलेले निष्ठावंत कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल

जावळीतील राजकीय वादाला CCTV फुटेजची नवी कलाटणी; सोसायटी ठरावांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धूळवड तीव्र
पांचगणी न्यूज नेटवर्क कुडाळ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध विकास सेवा सोसायट्यांच्या ठराव प्रक्रियेदरम्यान दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये निर्माण झालेल्या वादात आता हुमगाव येथील एका पेट्रोल पंपावरील कथित CCTV फुटेज समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. या फुटेजच्या आधारे दोन्ही

मानकुमरे यांचे आरोप आत्मप्रौढी आणि चुकीचे; शासकीय विश्रामगृहातील वादावर श्रीहरी गोळे यांचा गौप्यस्फोट
पांचगणी न्यूज नेटवर्क हुमगाव : हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे, बिनबुडाचे आणि केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेले आहेत. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणतीही धरपकड किंवा फरफटीचा प्रकार घडलेला नसून, मानकुमरे यांनी स्वतःच्या आत्मकेंद्रित राजकारणासाठी मीडियाला चुकीची माहिती दिली आहे, असा थेट हल्लाबोल भारतीय

जावली तालुक्यात चोरट्यांची दहशत: दापवडी व वहागावात भितीचे वातावरण; पोलिसांच्या गस्तीची ग्रामस्थांची मागणी
पांचगणी न्यूज नेटवर्क दापवडी (प्रतिनिधी): जावली तालुक्यातील दापवडी आणि वहागाव परिसरात सध्या अज्ञात चोरट्यांनी आणि संशयित भुरट्यांनी धुमाकूळ घातला असून, यामुळे स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचाली आणि चोरीच्या घटनांमुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी दापवडी आणि वहागावच्या ग्रामस्थांनी केली

शिपाई ते मुख्याध्यापक असा प्रेरणादायी प्रवास करणारे आदर्श शिक्षक नंदकुमार जगताप यांचे निधन; सायगावसह कोयना परिवारावर शोककळा
पांचगणी न्यूज नेटवर्क दापवडी : अत्यंत गरीब परिस्थितीतून जिद्दीच्या बळावर शिपाई पदापासून प्रवास सुरू करत पुढे शिक्षक व मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारणारे, इतिहास विषय तज्ज्ञ व अमोघ वक्तृत्वाचे धनी नंदकुमार जगताप सर यांचे आज दुःखाद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने सायगाव परिसरासह संपूर्ण कोयना एज्युकेशन सोसायटी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात तीव्र

शाळांमधील अस्वच्छतेचे वास्तव: जावळीत ‘स्वच्छ शाळा’ अभियानाचा फुसका बार; लाखो रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांची कोंडी
पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रसन्न पवार कुडाळ : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अशा गोंडस घोषणा देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या गप्पा मारणाऱ्या शिक्षण आणि प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा जावळी तालुक्यात उघडा पडला आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेली शौचालये आज दुरवस्थेच्या गर्तेत अडकली आहेत. कुठे दरवाजे तुटलेले, कुठे कड्या-कोयंडे नादुरुस्त, तर कुठे साचलेली प्रचंड घाण आणि



