
वाईत मद्यप्यांचा उपद्रव मोडून काढण्यासाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’; १२ जणांना घेतले ताब्यात, वाई पोलिसांची धडक कारवाई
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : शहरातील धार्मिक स्थळे, कृष्णा नदीचे घाट, ऐतिहासिक पसरणी घाट आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुडगूस घालणाऱ्या तळीरामांविरोधात वाई पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, कचरा करणे आणि भाविक व नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून त्रास देणाऱ्या १२ मद्यप्यांची थेट वाई पोलीस ठाण्याच्या दारात वरात काढत











