Home » वाई » भारत विकास परिषद वाई शाखेचे राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश ​महाराष्ट्र वेस्ट प्रांताच्या विविध स्पर्धांमध्ये पटकावली ३ पारितोषिके; संगीतकार कौशल इनामदार यांच्याकडून उपक्रमाचे विशेष कौतुक

भारत विकास परिषद वाई शाखेचे राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश ​महाराष्ट्र वेस्ट प्रांताच्या विविध स्पर्धांमध्ये पटकावली ३ पारितोषिके; संगीतकार कौशल इनामदार यांच्याकडून उपक्रमाचे विशेष कौतुक

पांचगणी न्यूज नेटवर्क 

वाई : भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र वेस्ट प्रांताच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूहगीत आणि ‘भारत को जानो’ राज्यस्तरीय स्पर्धेत वाई शाखेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील तब्बल १३ शाखांच्या चुरशीच्या स्पर्धेत वाई शाखेने ३ मानाची पारितोषिके पटकावून वाई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​या स्पर्धांमध्ये वाई शाखेने विविध उपक्रमांत अव्वल स्थान मिळवले. वाई तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांचे यशस्वी गायन करून घेतल्याबद्दल भारत विकास परिषदेचे प्रांताचे संस्कार संयोजक श्रीनिवास चनशेट्टी यांच्या हस्ते वाई शाखेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

​त्याचप्रमाणे ‘भारत को जानो’ या प्रांतीय स्पर्धेत वाई येथील दिशा अकॅडमी स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक पटकावले. प्रांताध्यक्ष पदमवारजी पवार यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशात दिशा स्कूलचे गुणवंत विद्यार्थी आर्य निलेश माने आणि साईश प्रशांत शिर्के यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

​विशेष म्हणजे, वाई शाखेचे अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर यांच्या पुढाकारातून गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र वेस्ट प्रांतात शिक्षकांसाठी देशभक्तीपर गीतांची नवीन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाला प्रांतातील शिक्षकांकडून तब्बल ८० टक्के असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे आणि संकल्पनेचे सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी खास कौतुक करून बोपर्डीकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

​मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल बोलताना, हे यश वाईतील सर्व शाळा, शिक्षक आणि भारत विकास परिषदेच्या सर्व सदस्यांच्या सामूहिक परिश्रमाचे फलित आहे, असे भावूक उद्गार वाई शाखेचे अध्यक्ष अरविंद बोपर्डीकर यांनी काढले. याप्रसंगी त्यांनी द्रविड हायस्कूल, गरवारे शाळा, वाई हायस्कूल, दिशा अकॅडमी, भारत विद्यालय, जॉईज अकॅडमी, कन्या शाळा, व्हिजन इंग्लिश मिडीयम आणि सेंट व्हिन्सेंट स्कूल या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. भारत विकास परिषदेच्या या अद्वितीय यशाबद्दल संपूर्ण वाई शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers