Home » सातारा » कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात दमदार एन्ट्री, पहिल्याच बैठकीला उदंड प्रतिसाद…

कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात दमदार एन्ट्री, पहिल्याच बैठकीला उदंड प्रतिसाद… 

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या महिन्यात झालेल्या ऐतिहासिक व निर्णायक आंदोलनामुळे देशभर कॉकरोच जनता पार्टीचा दबदबा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात साताऱ्यात दमदार एन्ट्री केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीला उदंड प्रतिसाद लाभला आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत सातारा येथे गरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्ते व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकी दरम्यान, सर्वसामान्य नागरिक व अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने यामध्ये शिक्षणाला महत्त्व दिले आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरातील शासकीय व नगरपालिका प्राथमिक शाळा आणि तेथील मूलभूत प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता आणि इतर महत्वाचा प्रश्नांवर न्याय मागण्याची भूमिका घेण्यात आली.

कॉकरोच जनता पार्टी, सी जी पी च्या माध्यामातून सुरू असलेल्या “स्कूल ठीक करो” या अजेंड्यावर सातारा जिल्ह्यातील समूह काम करणार आहे. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि मराठी माध्यमाच्या शाळांना अधिक सोईसुविधायुक्त करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांंना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याच्या अनुषंगाने तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद न करता तेथे गरजेनुसार सुधारणा घडवून आणण्यासाठी सी जी पी प्राधान्याने लढा देणार आहे. शाळांची गुणवत्ता टिकविणे. सक्षम नागरिक तयार करणे. या भूमिका घेवून व त्यासोबतच आरोग्य , रोजगार सह इतरही नागरिकांच्या नागरी सुविधांबाबत ताकदीने संवैधानिक मार्गाने प्रामाणिक व होतकरू सातारा जिल्ह्यातील युवकांच्या पुढाकाराने सकारात्मक कार्य हाती घेतले जाणार आहे.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह झालेल्या या पहिल्याच सी जी पी  बैठकीला सदस्यांचा परिचय व संवाद. “स्कूल ठीक करो” अभियान सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे कसे राबवायचे, याबाबत चर्चा. सी जी पी संघटनेच्या नवीन सदस्यांची नोंदणी व संघटनात्मक बांधणी.

स्थानिक संपर्क साधल्यास त्यांच्या मूलभूत मुद्द्यांना घेवुन त्यांच्यासोबत लोक चळवळ उभी करण्यात येणार आहे. सामान्य लोकाना न्याय मिळवून देण्यासाठी आजचा जेन झी अभ्यासपूर्ण काम करणाऱ्याच्या अनुषंगाने चर्चा झाली.

बैठकीस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अक्षय शिंदे , क्षितिज पगार , सरोश शेख यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी सातारा शहर व जिल्ह्यातील युवक व नागरिक तसेच गोरगरीब कष्टकरी शेतमजूर कचरावेचक यांच्या बद्दल कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे , माणिक कांबळे, प्रथमेश सावंत, शेख नजमुनीसा फय्याज, तुषार बोकेफोडे, आदित्य कांबळे, धनराज जगदाळे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नासाठी चळवळ उभी राहत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. डी.जे. डॉल्बी व धांगडधिंगा यापासून अलिप्त असणाऱ्या युवकांना रचनात्मक कार्यामध्ये समाविष्ट करून त्यांच्या शक्तीचा निश्चितच सी. जी.पी. माध्यमातून सातारा जिल्ह्याला विधायक दृष्टिकोनातून फायदा होईल. असे स्पष्ट मत ज्येष्ठ नागरिक अँड विलास वहागावकर, मच्छिंद्रनाथ जाधव, दत्ता केंगार, दाऊद खान मुल्ला यांनी व्यक्त केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers