Home » तापोळा » नानांच्या जाण्याने गहिवरला कोयना काठ…. दुर्गम कोयना भागात केलेल्या कामाच्या आठवणी जाग्या…

नानांच्या जाण्याने गहिवरला कोयना काठ…. दुर्गम कोयना भागात केलेल्या कामाच्या आठवणी जाग्या…

पांचगणी न्यूज नेटवर्क

कास : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे आज सकाळी अचानक दुःखद निधन झाल्याचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसला असतानाच याच नानांच्या आठवणीने कोयनाकाठही गहिवरला.
त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुर्गम अशा बामनोली, तापोळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव असलेले दरे गाव या परिसरात केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे त्यांची तीव्रतेने आठवण आज सर्वांनाच झाली.
तसा कोयना खोऱ्यातील या परिसराचा व नानांचा काहीही संबंध नाही परंतु महाबळेश्वर तालुक्यातील व जावळी तालुक्यातील या अतिवृष्टीच्या या भागात पावसाने प्रचंड नुकसान झाल्यानंतर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतांची बांधबंधिस्ती, तालींची दुरुस्ती, तसेच जमीन सपाटीकरण अशी अनेक कामे करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व नानांच्या स्नेहातून कोयना नदीतील गाळ काढण्याचे कामही नाम फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले. या दुर्गम भागात कोट्यावधी रुपयांची कामे शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी केली. या मातीशी कोणताही संबंध नसताना दुर्गम, गरीब भागातील शेतकऱ्यांसाठी केलेले हे कार्य या परिसरातील जनतेच्या कायम स्मरणात राहणार आहे. नाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी अनेक वेळा आले. येथील परिसर, शेती व पर्यटनातील संधी पाहून त्यांनी या भागात काम करण्याचे प्रत्यक्ष करून दाखवले. आज त्यांच्या अकाली जाण्याने या दुर्गम भागातील शेतकरी गहिवरून गेला आहे. भविष्यात संकट प्रसंगी धावून येणारा नानांसारखा आधार गेल्याने या भागातून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.

 कोयना भागातील अनेक दुर्गम गावांमध्ये नाना व मकरंद अनासपुरे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम घडले. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले असले तरी आमच्या कोयना भागाच्या नानांप्रती खूप संवेदना आहेत. कुटुंबातील माणूस गेल्याचे दुःख झाले आहे.
संतोष मालुसरे सामाजिक कार्यकर्ते फुरूस

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers