
महाबळेश्वरच्या दुर्गम भागात बिबट्याचा उच्छाद; ‘विषारी नागापेक्षा बिबट्याचीच दहशत भयानक!’, सूर्यास्तापूर्वीच घरे बंदिस्त करण्याची वेळ
झांजवडसह १५ हून अधिक गावांमध्ये भीतीचे सावट; वन विभागाने तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची उद्विग्न मागणी पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप बामणोली : महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात सध्या माणसांपेक्षा बिबट्याच्या भयावह दहशतीने स्थानिक भूमिपुत्रांना रात्रीच्या अंधारापूर्वीच घरात बंदिस्त व्हावे लागत आहे. “जमिनीवर सरपटणाऱ्या विषारी नागाची भीती एक वेळ परवडली, पण या बिबट्याच्या






