Home » पांचगणी » पाचगणीत उद्या रोटरी क्लबचा शानदार पदग्रहण सोहळा; अध्यक्षपदी रोटन. आदित्य गोळे, सचिवपदी ऋषी होळकर

पाचगणीत उद्या रोटरी क्लबचा शानदार पदग्रहण सोहळा; अध्यक्षपदी रोटन. आदित्य गोळे, सचिवपदी ऋषी होळकर

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : पर्यटन आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ पाचगणीचा (क्लब क्र. १५५३३ | आर.आय. जिल्हा ३१३२) रोटरी वर्ष २०२६-२७ साठीचा नूतन पदग्रहण सोहळा मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भिलार येथील हॉटेल शिव सागर रिसॉर्ट्समध्ये सायंकाळी ५:३० वाजता हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्या वातावरणात पार पडणार आहे.

​या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ पाचगणीच्या अध्यक्षपदी रोटन. आदित्य गोळे आणि सचिवपदी रोटन. ऋषी होळकर हे अधिकृतपणे आपल्या पदांची सूत्रे स्वीकारणार असून, त्यांच्यासह रोटरी वर्ष २०२६-२७ च्या नूतन संचालक मंडळाचाही पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पाचगणी रोटरी क्लबने निर्माण केलेला नावलौकिक आणि सेवाकार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प याप्रसंगी नूतन कार्यकारिणीतर्फे करण्यात येणार आहे.

​प्रमुख पाहुण्यांची विशेष उपस्थिती

या गरिमापूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट (DGE) रोटन. क्षितिज झवरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर सन्माननीय पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर (AG) रोटन. प्रद्युम्न आगाटे उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

​माजी अध्यक्ष रोटन. अमित बोधे आणि माजी सचिव रोटन. आदित्य गोळे यांच्या कार्यकाळातील यशस्वी सामाजिक प्रकल्पांचा आढावा घेत, नूतन संघाकडे नेतृत्व सोपवले जाईल. या दिमाखदार सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ पाचगणीचे सर्व सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी परिवार आणि मावळत्या कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers