Home » पांचगणी » सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या खेळाडूंचा डंका; हिंदुस्तान एफ.सी.चे विजेतेपद

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या खेळाडूंचा डंका; हिंदुस्तान एफ.सी.चे विजेतेपद

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी :

सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल चॅम्पियनशिप २०२६–२७ स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी. संघाने अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक सामन्यात विजेतेपदावर आपले नाव कोरले. या अजिंक्यपद मिळवणाऱ्या संघात विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (CBSE), पांचगणीच्या चार गुणवंत खेळाडूंनी मोलाचे योगदान देत आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली.

​संपूर्ण स्पर्धेत हिंदुस्तान एफ.सी.च्या खेळाडूंनी कमालीचे सातत्य, शिस्त आणि प्रभावी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीत हिंदुस्तान एफ.सी.ने अत्यंत दबावाच्या सामन्यात कराड शिवाजी एफ.सी.चा २–० असा दणदणीत पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यानंतर अत्यंत उत्सुकतेच्या बनलेल्या अंतिम सामन्यात Yash FC, Satara आणि हिंदुस्तान एफ.सी. यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटवर गेला. यात ५–४ अशा निसटत्या पण अत्यंत रोमांचक फरकाने विजय मिळवत हिंदुस्तान एफ.सी.ने चॅम्पियनशिप ट्रॉफीवर कब्जा केला.

​या ऐतिहासिक विजयात विद्यानिकेतन CBSE चे रुद्र बारगुडे (इयत्ता ७ वी), हर्षराज जगताप (इयत्ता ७ वी), रुद्र ढेबे (इयत्ता ७ वी) आणि जनक मेहता (इयत्ता ८ वी) यांनी उत्कृष्ट सांघिक भावना आणि जिद्दीच्या जोरावर संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक मोनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच अचूक रणनीती आणि सरावाच्या बळावर खेळाडूंनी मैदानात उत्कृष्ट प्रदर्शन केले.

​विजयी संघ आणि खेळाडूंना सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख अमृत गायकवाड यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​चौकट:

शाळा व्यवस्थापनाकडून खेळाडूंचे विशेष अभिनंदन!

जिल्हास्तरावर विद्यानिकेतन आणि पांचगणी शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या चारही खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक मोनिल शिंदे यांचे विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या डायरेक्टर भारती बिरामणे, मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे, प्राचार्य मनोज पिल्ले, ऑफिस कोऑर्डिनेटर राजन गाडेकर, ॲडमिन मेंबर सुशांत सर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers