महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाचा तांडव! प्रवाशांना अरेरावी करत जाब विचारणाऱ्या पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; मुजोर अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : पर्यटनाची जागतिक राजधानी असलेल्या महाबळेश्वरच्या मुख्य बस स्थानकातून एक अत्यंत संतापजनक आणि शासकीय यंत्रणेला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी महामंडळाच्या एका मुजोर वाहतूक निरीक्षकाने (Traffic Inspector) आपल्या पदाची आणि कर्तव्याची सर्व संकेत पायदळी तुडवत प्रवाशांशी हुज्जत घातली, इतकेच नव्हे तर प्रवाशांची बाजू घेऊन सनदशीर मार्गाने…