वाई पोलीस दलावर शोककळा: कर्तव्यदक्ष ‘डीबी’ पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; पत्नी गंभीर जखमी
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई: वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत शुक्रवारी पहाटे एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. या अपघातात वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागातील धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाई पोलीस दलासह…