निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घेताना नियमांचे पालन करा; विल्सन पॉईंटवर वनविभागाचे कडक निर्बंध!
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर: निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटवर (सनराईज पॉईंट) दररोज हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, हे ठिकाण सातारा वनविभागाच्या अधिपत्याखाली येत असून ते एक ‘राखीव वनक्षेत्र’ आहे. या भागातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती भेकवली यांच्या वतीने संयुक्त पावले उचलण्यात…