वाईच्या ज्ञानदीप स्कूलची राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत बाजी; मुंबई शहराचा पराभव करत पटकावले अजिंक्यपद
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : नवी मुंबई, खारघर येथील व्हिबॉर्ग हायस्कूलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत वाई येथील ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात ज्ञानदीपच्या संघाने मुंबई शहराच्या संघावर १३-९ अशा गोलफरकाने मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत ज्ञानदीपच्या संघाने पहिल्या सामन्यापासूनच प्रभावी खेळ केला….