पारशी पॉईंटवर अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकर अन् पिल्लू ठार
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील प्रसिद्ध पारशी पॉईंट परिसरात गुरुवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका भेकराचा आणि त्याच्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेले स्थानिक व्यावसायिक संतोष पिसाळ यांच्या ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले भेकर आणि…