पांचगणी न्यूज नेटवर्क / अजित जगताप
सातारा : सहकार क्षेत्रामध्ये नियमाप्रमाणे वार्षिक सभा आयोजित केली जाते. या सभेला अनेकदा गोंधळ व आरोप प्रत्यारोप होतात. परंतु ,अलीकडच्या काळामध्ये सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेला आदर्शवत अशी कामगिरी होत असल्याने सर्व सभासदांची संचालकांनी मनी जिंकली आहेत. हे या वार्षिक सभेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. सातारा जिल्हा प्राथमिक बँकेचे अध्यक्ष विजय ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही वादग्रस्त विधान न करता अत्यंत सहकार खात्याला साजेस अशा पद्धतीने ठराव करण्यात आले निष्क्रिय सभासदांना बँकेच्या प्रवाहात आणण्यासाठी संचालक मंडळाने अभिनव कर्ज योजना सुरू करून हम सब एक आहे असा नारा दिला आहे. या योजनेअंतर्गत ८.६५ टक्के व्याज दराने २० लाखा रुपयापर्यंतच्या कर्जाची सुविधा दिनांक १५ जुलै पर्यंत उपलब्ध होणार आहे. याचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाच्या एकत्रीकरणाने खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षक बँकेने पाठीमागच्या अनुभवाचा चांगलाच धडा शिकला आहे. प्राथमिक शिक्षक बँकेने गेल्या वर्षापेक्षा यावर्षी ३५.७१ कोटी व कर्ज वाटपात ३०.५७ कोटी अनेक प्राथमिक शिक्षक बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने१६.४१ कोटी रुपयांची गुंतवणुकीमध्ये वाढ केली आहे. ३१ मार्च अखेर बँकेचे ठेवी ७३५ कोटी आणि कर्ज४८९ कोटी त्याचबरोबर ची भांडवली गुंतवणूक ३२४ कोटी आणि खेळते भांडवल ८६४ कोटी रुपयांपर्यंत प्राथमिक शिक्षण बँकेने मजल मारली आहे. प्राथमिक शिक्षक बँकेला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या मयत सभासदांच्या वारसांनाही तीन कोटी तीस लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे तसेच १५२ सभासदांना आजारपणासाठी १४ लाख ७७ हजार रुपयाची मदत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे.
प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती आणि इतर प्राथमिक शिक्षक संघटनेने एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे बदल घडवून आणलेला आहे. सर्व नेतेगन मंडळींनी समय सूचकता व सहकार क्षेत्रातील झालेल्या नव्या नेम आणि अटी यांचा विचार विनिमय करून धोरणात्मक निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षक बँकेच्या या सभेसाठी बँकेचे उपाध्यक्ष नितीन फरांदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले यांनीही चांगले मार्गदर्शन केले. बँक संचालक किरण यादव, नितीन काळे, ज्ञानोबा ढापरे, विशाल कणसे, पुष्पलता बोबडे, निशा मुळे, महेंद्र जानुगडे, नितीन राजे ,तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे ,नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे आणि तज्ञ संचालक अमित निकम व बँकेचे माजी पदाधिकारी सिद्धेश्वर पुस्तके, उदय शिंदे, मारुती खाडे, अनिल जायकल मच्छिंद्र मुळीक मिलन मुळे , लावंड बापू, मायेनकर गुरुजी, विश्वंभर रणवरे , विजयकुमार भुजबळ, अंकुश नांगरे, देशमाने, अगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या सभेला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धनसिंग सोनवणे, बाजीराव शेटे, प्रशांत मोरे, उदय भंडारे यांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या घडामोडी बाबत काही प्रश्न उपस्थित करून प्राथमिक शिक्षक बँकेच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली. त्याचीही संचालक मंडळाने समर्पक उत्तर दिले.
यावेळी प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी खऱ्या अर्थाने सामान्य सभासद सुद्धा उपस्थित राहिले होते. एक आदर्शवत प्राथमिक शिक्षक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रात्यक्षिक शिक्षक बँकेच्या सर्वांनीच खूप मोठे योगदान दिले आहे. एकेकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये प्राथमिक शिक्षक बँकेची सभा गाजली होती. आता प्राथमिक शिक्षक बँकेचा आदर्श इतर सहकारी बँकेने घ्यावा असा सल्ला देण्यात येत आहे. ही खरं म्हणजे प्राथमिक शिक्षक बँकेने केलेल्या परिवर्तनाची नांदी ठरली आहे. .



