सातारा जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांमधील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या बेफाम पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या…