पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
शिरवळ : पुणे सातारा हद्दीतील महामार्ग नजीक शिरवळ नगरीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांसोबत अनेक जण अमली पदार्थ व पावडर नशा पान करत आहेत. याबाबत लेखी तक्रार करूनही गंभीर दखल घेतली नसल्यामुळे शिरवळकरांनी आज मोर्चाद्वारे अमली पदार्थ विरोधात आंदोलन केले. अमली पदार्थाचा व्यापार व बाळगणाऱ्यांना कायदेशीर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन केले जाईल असा इशारा शिरवळकरांनी दिला आहे. संपूर्ण शिरवळ कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
औद्योगिक नगरी म्हणून झपाट्याने वाढ झालेल्या शिरवळ नगरीमध्ये युवा पिढी सहजरीत्या उपलब्ध होत असणाऱ्या एम.डी. पावडर व इतर अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठवण, वाहतूक व सेवन करीत आहेत. त्यामुळे संपूर्ण युवा पिढी बरबाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या अमली पदार्थाच्या धंद्यात असणाऱ्या सर्वांवरच एन डी पी एस ऍक्ट १९८५ नुसार तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला सर्व शिरवळकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
शिरवळ परिसरात एम.डी. पावडर व इतर अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठवण, वाहतूक व सेवन होत आहे.त्यामुळे युवक व्यसनाधीन होत आहेत, गुन्हेगारी वाढली आहे. परिसरातील कायदाव सुव्यवस्था धोक्यात येत आहे. अन्य जिल्ह्यातील नार्कोटिक्स पथक येथे येऊन कारवाई करत आहे. परंतु त्याची कल्पना शिरोळ पोलीस ठाण्याला होत नाही याची नवल वाटते. यामुळे अमली पदार्थ वरोधी पथक व पोलीस यंत्रणा सतर्क करणे गरजेचे आहे.
त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ गोपनीय चौकशी करून दोषींविरुद्ध Narcotic Drugs and Psychotropic
Substances Act, 1985 (NDPS Act) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असाच मोर्चाचा प्रमुख उद्दिष्ट होता. गेली दीड वर्षे या संबंधित कल्पना शिरवळ पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देऊन ही कारवाई केली नाही. या साठी . एन डी पी एस ऍक्ट आर्टिकल ५९ नुसार कारवाई होणे गरजेचे आहे. असे आंदोलकांनी ठासून सांगितले. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती. त्यांची इतर जिल्ह्यात पदोन्नती झाल्याची माहिती देण्यात आली.
शिरवळ परिसरात गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने नियमित गस्त घालावी. तक्रार व खबर मिळताच छापेमारी करावी . तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या पाहिजेत. तसेच शाळा,
महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित केले.
पाहिजेत.समाजहित व युवकांच्या भवितव्यासाठी या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी. असेही नमूद केले आहे.
या मागणीसाठी निघालेल्या शिरवळकरांच्या मोर्चामध्ये सातारा जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, पंचायत समिती सभापती सौ छायाताई जाधव, रवींद्र दुधगावकर सरपंच, राहुल तांबे उपसरपंच ,राजेंद्र तांबे माजी सभापती ,गुरुदेव बरदाडे माजी सभापती, आदेश भापकर, चंद्रकांत मगर ,राजेंद्र मगर, कौशिक जोशी, सौ सुरेखा हाडके, सौ स्वाती बरदाडे यांच्यासह शिरवळ ग्रामस्थ व्यापारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनुप सूर्यवंशी यांनी अमली पदार्थ सेवनाची तीव्रता भयानक असल्याचे सांगून शिरवळ पोलीस ठाण्यातील कार्यरत असणाऱ्या यापूर्वीच्याही अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाल्यास पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील आर्थिक हितसंबंध उघडकीस निश्चित येतील. असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिरवळ पोलीस ठाण्याचे नव्याने बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महेश इंगळे यांनी निवेदन स्वीकारले. तसेच उचित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.



