पांचगणी न्यूज नेटवर्क
पाटण : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी ५६,८४१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
कोयना धरणात सध्या उपलब्ध ६५.८० टीएमसी तर उपयुक्त ६०.६८ टीएमसी पाणीसाठा आहे. मंगळवार संध्याकाळ पाच ते बुधवार संध्याकाळी पाच या चोवीस तासांत व १ जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस कोयना १२७ ( २१५२ )मिलिमीटर, नवजा १२५ ( २४७३ ) मिलिमीटर, महाबळेश्वर १९७( २८९९ ) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत धरणात ३.४७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून ३९.४५ टीएमसी पाण्याची गरज आहे.
Post Views: 106



