‘रीड अँड राईज स्कूल’च्या भिंतींवर उमटले कल्पकतेचे रंग; ‘डिझाईन युवर क्लासरूम’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सजवली स्वप्ने!
पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे पाचगणी (प्रतिनिधी): चौकटबद्ध अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला, तर वर्गखोल्यांचे रूप कसे बदलू शकते, याचा अनोखा प्रत्यय पाचगणी येथील नामांकित ‘रीड अँड राईज स्कूल’मध्ये पाहायला मिळाला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिझाईन युवर क्लासरूम’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीची उधळण करत चार भिंतींना केवळ रंगवले नाही, तर त्यांना शैक्षणिक…