Home » पांचगणी » पाचगणी पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना नगरसेवक प्रसाद कारंजकर यांच्याकडून छत्र्यांचे वाटप

पाचगणी पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना नगरसेवक प्रसाद कारंजकर यांच्याकडून छत्र्यांचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी (प्रतिनिधी) : पाचगणी शहरातील सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समाजकार्यात सक्रिय असलेले नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व होमगार्ड जवानांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व कर्मचारी उपस्थित होते.

​पावसाळ्यात मुसळधार पावसातही अहोरात्र रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना जपत प्रसाद कारंजकर यांनी हा दिलासादायक उपक्रम राबविला. “समाजाचे आपण काही देणे लागतो” या दातृत्वाच्या भावनेतून केलेल्या या मदतीमुळे कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​श्री. प्रसाद कारंजकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि जनहिताच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी होत आहेत. आपल्या तत्पर समाजसेवेच्या जोरावर त्यांनी एक अभ्यासू आणि कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणून समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजसेवेची ही अखंड परंपरा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून जोरदार कौतुक होत आहे.​या वाटप प्रसंगी उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड जवानांनी प्रसाद कारंजकर यांच्या या संवेदनशील उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच, समाजहितासाठी आगामी काळातही अशाच प्रकारचे विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस कारंजकर यांनी या वेळी व्यक्त केला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers