करहर नगरीत वैष्णवांचा मेळा; ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने जावळी-महाबळेश्वर परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” या अभंगवाणीची प्रचिती देत लाखो भाविकांच्या उपस्थितीत करहर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याचे आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या वैकुंठवासी ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांनी सुरू केलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ‘ग्यानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल…