पाचगणी न्यूज नेटवर्क
करहर : पारदर्शकता, तत्पर सेवा आणि ग्राहकांच्या भक्कम विश्वासाच्या बळावर ‘उन्नती फिनसर्व्ह’ आणि ‘उत्कर्ष को-ऑप क्रेडिट सोसायटी’ यांनी सहकार व वित्तीय क्षेत्रात आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे संस्थापक हनुमंत रांजणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित रांजणे यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे संस्थेने प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला आहे.
सर्वसामान्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि ग्राहकांना आधुनिक व सुरक्षित आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे हे संस्थेचे मुख्य ध्येय राहिले आहे. संस्थापक हनुमंत रांजणे यांच्या समृद्ध अनुभवामुळे संस्थेची पायाभरणी मजबूत झाली असून, व्यवस्थापकीय संचालक अभिजित रांजणे यांनी आपल्या युवा व अभ्यासू नेतृत्वाच्या जोरावर कामकाजात आधुनिकतेचा मेळ घातला आहे. यासोबतच ‘उत्कर्ष को-ऑप क्रेडिट सोसायटी’चे अध्यक्ष सुशील गोळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव मानकुमरे यांच्या तत्पर नियोजनामुळे व प्रशासकीय कौशल्यामुळे संस्थेची दैनंदिन कार्यप्रणाली अधिक मजबूत व ग्राहकभिमुख बनली आहे.
केवळ आर्थिक व्यवहार न ठेवता ग्राहकांशी कौटुंबिक नाते जपणे, हेच ‘उन्नती फिनसर्व्ह’ आणि ‘उत्कर्ष को-ऑप क्रेडिट सोसायटी’चे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. आगामी काळातही सभासदांना अधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा आणि विविध नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा संकल्प संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
करहर येथील विठ्ठल मंदिरासमोर भव्य शेड; उन्नती परिवाराचा सामाजिक उपक्रम
‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहर येथील ‘क’ वर्ग देवस्थान असलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात उन्नती परिवाराच्या वतीने भव्य-दिव्य असे पत्र्यांचे शेड उभारण्यात आले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऊन-पावसाचा त्रास होऊ नये व त्यांची उत्तम सोय व्हावी, या हेतूने उन्नती परिवाराने ही सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमाबद्दल करहर परिसरातील ग्रामस्थ व भाविकांकडून उन्नती परिवाराचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.



