Home » पांचगणी » पंचायत समिती सदस्या वंदनाताई भिलारे यांचेकडून रेनकोट वाटपातून अंगणवाडी व आशा सेविकांचा सन्मान; भिलारमध्ये समाजोपयोगी उपक्रम

पंचायत समिती सदस्या वंदनाताई भिलारे यांचेकडून रेनकोट वाटपातून अंगणवाडी व आशा सेविकांचा सन्मान; भिलारमध्ये समाजोपयोगी उपक्रम

पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : भिलार येथे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाबळेश्वर पंचायत समितीच्या सदस्या सौ. वंदना ताई भिलारे यांच्या विशेष पुढाकारातून भिलार परिसरातील आरोग्य आणि बालविकास क्षेत्रात मोलाची सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविकांना रेनकोटचे वाटप करून त्यांच्या सेवाभावाचा सत्कार करण्यात आला.

​महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले यांच्या शुभहस्ते या रेनकोटचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी नमूद केले की, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणि बालकांचे पोषण सुदृढ ठेवण्यात अंगणवाडी व आशा सेविकांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. मुसळधार पाऊस असो वा कडक ऊन, प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत या महिला घराघरांत जाऊन नागरिकांची सेवा करतात. त्यामुळे त्यांच्या या समर्पणाची दखल घेऊन त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य ठरते.

​आपले मनोगत व्यक्त करताना पंचायत समिती सदस्या सौ. वंदना ताई भिलारे यांनी सांगितले की, पावसाळ्यात गावपातळीवर फिरून काम करताना या सेविकांना कोणताही त्रास होऊ नये, या हेतूने रेनकोट देण्यात आले असून, भविष्यातही अशा लोकोपयोगी उपक्रमांची परंपरा सुरूच ठेवली जाईल.

​याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, प्रशासक तथा माजी सरपंच शिवाजी भिलारे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस पाटील रुपाली कांबळे, डॉ. तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे, किसनशेठ भिलारे, नितीन भिलारे, विजय भिलारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भिलारचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​रेनकोटचे वाटप झाल्यानंतर सर्व अंगणवाडी व आशा सेविकांनी या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल पंचायत समिती सदस्या सौ. वंदना ताई भिलारे व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers