Home » पांचगणी » मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी, ता 15 : गणेशोत्सवाच्या आणि आगामी सण-उत्सवांच्या पावन पर्वावर राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष ‘आरती संग्रहा’चे शानदार प्रकाशन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. येथील ‘रेन फॉरेस्ट’ येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात हा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

​प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री मकरंदआबा पाटील म्हणाले, “आपली संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपण्याचे काम अशा उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने होत असते. राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंच नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत अग्रभागी असतो. गणेशोत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी हा आरती संग्रह अत्यंत उपयुक्त ठरेल. तरुणांनी एकत्र येऊन धार्मिक मूल्यांचे संवर्धन करणे कौतुकास्पद आहे,” अशा शब्दांत त्यांनी युवा मंचच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.

​या सोहळ्यास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक उद्योजक राजेश पारठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मालुसरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीणशेठ भिलारे, गोडवली सोसायटीचे अध्यक्ष आर. डी. मालुसरे, सचिन उत्तेकर, चंद्रशेखर बावळेकर, संतोष आंब्रांळे, बंडा राजपुरे आणि प्रणव पारठे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमा दरम्यान राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या सामाजिक व धार्मिक कार्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी आरती संग्रहाच्या निर्मितीबद्दल युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे आयोजन अत्यंत भावूक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers