Home » पांचगणी » इनर व्हील क्लबतर्फे बेलएअर हॉस्पिटलमधील टीबी रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप; सामाजिक बांधिलकीतून आरोग्यदायी उपक्रम

इनर व्हील क्लबतर्फे बेलएअर हॉस्पिटलमधील टीबी रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप; सामाजिक बांधिलकीतून आरोग्यदायी उपक्रम

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी, ता. 28 : आरोग्य सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालत ‘इनर व्हील क्लब ऑफ पांचगणी’ (डिस्ट्रिक्ट ३१३) च्या वतीने एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. येथील प्रसिद्ध बेलएअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या टीबी (क्षयरोग) रुग्णांना जलद पुनर्प्राप्ती आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

​क्षयरोगाच्या उपचारादरम्यान औषधांसोबतच रुग्णांना उच्च प्रथिनेयुक्त आणि ऊर्जादायी आहाराची अत्यंत गरज असते. हीच गरज ओळखून क्लबच्या वतीने रुग्णांना गूळ, राजगिरा लाडू, खजूर लाडू आणि शेंगदाणा चिक्की अशा पारंपरिक आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहाराचे वाटप करण्यात आले. या सर्व पदार्थांमुळे रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

​या मानवतावादी आणि स्तुत्य उपक्रमासाठी डॉ. अरुणा रसाळ यांनी विशेष पुढाकार घेतला. तर या उपक्रमाचे संपूर्ण प्रायोजकत्व श्वेता बोधे, संगीता पाटील, शिल्पा शिंदे, पूजा परदेशी (धनंजय चणा), रसिका बोधे, प्रियंका भंडारी, स्नेहा सिंग आणि जयश्री बोधे यांनी भूषवले.

​या वाटप प्रसंगी इनर व्हील क्लब ऑफ पांचगणीच्या अध्यक्षा श्वेता बोधे, सेक्रेटरी स्नेहा होळकर, खजिनदार गौरी भिलारे, एडिटर जयश्री बोधे, पीपी संगीता पाटील, डॉ. अरुणा रसाळ आणि डॉ. अरुणा भिलारे यांच्यासह क्लबच्या पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इनर व्हील क्लबच्या या संवेदनशील आणि आरोग्यदायी उपक्रमाबद्दल बेलएअर हॉस्पिटल प्रशासन, रुग्ण आणि स्थानिक नागरिकांमधून विशेष आभार व कौतुक व्यक्त होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers