दुष्काळाच्या यादीत जावलीचा तातडीने समावेश करा; अन्यथा तहसीलवर धडकणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मेढा येथे तहसीलदारांकडे जोरदार मागणी
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : “जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या, कागदावरचा सुकाळ बंद करून शेतांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे पंचनामे करा आणि जावलीचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा,” अशा शब्दांत संतप्त भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जावली तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. पक्षसंघटनेच्या वतीने जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे…