Home » सातारा » जिल्हा बँक निवडणूक चिन्हात मंत्री गोरेंचा फुटबॉल तर संजीवराजेंची शिट्टी….

जिल्हा बँक निवडणूक चिन्हात मंत्री गोरेंचा फुटबॉल तर संजीवराजेंची शिट्टी…. 

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये नऊ जागेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर उर्वरित जागेंसाठी महायुतीमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे . भाजप नेते व राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा फुटबॉल तर शिवसेनेचे नेते आणि माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची शिट्टी अशी फलटण व माण मध्ये सोसायटी मतदारसंघात लढत पाहण्यास मिळणार आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या उमेदवारांच्या अंतिम यादीमध्ये चिन्ह वाटप झाले आहे. यामध्ये जावळी तालुक्यातील एकमेव अनुभवी संचालक असलेले ज्ञानदेव किसन रांजणे यांना ट्रॅक्टर तर महाबळेश्वरच्या नवखे उमेदवार संजय मोरे यांना प्रेशर कुकर चिन्ह मिळाले आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने १० वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना निवडणूक लढवता येणार नाही. असा निकाल दिल्यामुळे अनेक प्रतिष्ठित व मातब्बर संचालकांना पद सोडावे लागले. त्यांच्या जागी सामान्य कुटुंबातील इतरांना संधी मिळाली आहे. त्यातील काही जण बिनविरोध निवडून आले आहेत.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पाटण तालुका सोसायटी मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांना कपाट तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजित पाटणकर यांना ऑटो रिक्षा चिन्ह मिळाले आहे. इतर मागासवर्गीय सदस्यांमध्ये संदीप पाचांगणे यांना बॅट घ्यावी लागली तर योगेश फडतरे यांची छत्री चिन्ह मिळाले आहे. पावसाळ्यात उपयोगी पडणारी छत्री आता उन्हाळा असल्याने छत्रीचा वापर करावा लागत आहे. यामध्ये कोणाच्या हातून कसे मतदान होते? इतर मागासवर्गीय मतदार संघात हातात छत्री की बॅट असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग सदस्यांमध्ये अर्जुन काळे यांना छत्री तर सुनील वाघ यांना किटली हे चिन्ह मिळाले आहे. मजूर सहकारी संस्थेमध्ये चंद्रकांत जाधव यांचे चिन्ह छत्री तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील सुरेश वाघ यांची किटली चिन्ह घेतले आहे. वाघ यांच्यामुळे दोन मतदारसंघात निवडणुका होत असून निवडणुकीमध्ये नशीब आजमावत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकास सोसायटी मतदार संघात पांढरी मतपत्रिका तर अनुसूचित जाती जमातीसाठी फिकट निळा, इतर मागासवर्गीयांसाठी फिकट हिरवा आणि विमुक्त जाती फिकट पिवळा व औद्योगिक मजूर सहकारी संस्थेतून फिकट गुलाबी रंग मतपत्रिका मतदानासाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर काही उमेदवारांनी छताचा पंखा, टेबल, हिरा, अंगठी, कप बशी, स्कूटर, कॅरम बोर्ड, चष्मा, खटारा, चालण्याची काठी, मोबाईल, हेलिकॉप्टर, बस, टॅक्सी, लिफाफा हे सुद्धा चिन्ह काही उमेदवारांनी घेतले आहे. माण तालुक्यामध्ये गोरे बंधू आणि त्यांच्या विरोधात मनोजकुमार पोळ असा तिरंगी सामना तर फलटणमध्ये भाजपचे समशेर हिंदुराव नाईक निंबाळकर व शिवसेनेचे श्रीमंत संजीव राजे विजयसिंह नाईक निंबाळकर अशी प्रमुख लढत होत आहे. सातारा जिल्ह्यात महायुती मधील अंतर्गत लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुसूचित जाती जमाती मध्ये फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या विरोधात सत्यवान कांबळे, सुरेश गायकवाड, रवींद्र बडेकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. महायुतीमध्ये काही जागांसाठी एक मत झाले असले तरी प्रतिष्ठित असलेल्या फलटण व माण आणि कोरेगाव तालुक्यात महायुतीच्या अंतर्गतच निवडणूक होत आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन हे भाजपचे होतील. असे भाकीत केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. महायुती मधील शिवसेनेचा धनुष्यबाण व अचूक वेळ साधणारी राष्ट्रवादी व या दोघांच्या मधून कमळ फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचे कसोटी लागली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या गाठीभेटी व आश्वासने आणि इतर लोकशाही मार्गाने रसद पुरवण्याच्या हालचाली सुरू झालेले आहेत. पूर्वी सोसायटीच्या ठराव असणाऱ्या सभासद मतदारांना सहलीला घेऊन जावे लागत होते. आता इतर मतदारसंघातीलही मतदारांच्या अपेक्षा वाढल्याने या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे आता विधानसभेच्या अगोदर रंगीत तालीम मानली जात आहे. कोण कोणाची शिट्टी वाजवणार? कोणाचा फुटबॉल होणार? हे आता अंतर्गत खेळाने निश्चितच उघड होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अर्ज दाखल केले आहे. तसेच माघारी घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही निवडणूक माहित अंतर्गत असून सर्वपक्षीय चर्चा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमशी बोलताना दिली. ……………………………..

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers