कराड

जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती स्फोट: कराडचा सुपुत्र अर्जुन जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लष्कराच्या छावणीत झालेल्या एका अपघाती स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीरपुत्रांना वीरमरण आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव आणि ठाणे जिल्ह्यातील ऐरोली येथील जवान चव्हाण विक्रम बालकृष्ण यांचा समावेश