जावळी

कामाच्या दिरंगाई अन् निकृष्ट दर्जाविरोधात कुडाळवासीय आक्रमक; १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशारा!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​कुडाळ : “आमचा विरोध विकासाला किंवा कामाला मुळीच नाही, तर काम करण्याच्या मनमानी पद्धतीला आणि होणाऱ्या दिरंगाईला आहे…” असा संतप्त सूर लावत कुडाळ येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राथमिक जिल्हा मार्गाच्या रखडलेल्या व दर्जाहीन कामाविरोधात आवाज उठवत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे. ​आमदार शिवेंद्रसिंहराजे

पर्यटकांसह नागरिकांना मोठा दिलासा! केळघर घाट अखेर सर्व वाहतुकीसाठी खुला; सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : सततच्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेला महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील प्रसिद्ध केळघर घाट आता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. घाट परिसरातील पावसाचा जोर ओसरल्याने आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर हा मार्ग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जावळी उपविभागाने तहसीलदारांना

जावलीच्या कन्येचा नवी मुंबईत डंका! अश्विनी बेलोशे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नवी मुंबई कार्याध्यक्षपदी निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क  काटवली : जावली तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावच्या सुकन्या सौ. अश्विनी सुयोग बेलोशे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ‘नवी मुंबई कार्याध्यक्षा’पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी सोपवली. मुंबई व नवी मुंबई परिसरातील त्यांच्या उल्लेखनीय

झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीला शैक्षणिक साहित्य व संगणक संच भेट; ग्रामस्थांची उपस्थिती

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (ता. जावळी) येथे शैक्षणिक साहित्य वाटप व संगणक संच हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला. ठाणे येथील ‘झेप प्रतिष्ठान’ या सामाजिक व सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर डिजिटल शिक्षणाला गती मिळावी या उद्देशाने शाळेला एक अद्ययावत संगणक संच

बेलोशीत गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन; गुरुवर्य दत्तात्रय कळंबे महाराज समाधी परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी, ता. 28 : बेलोशी (ता जावली ) येथे कर्मयोगी संत दत्तात्रय कळंबे महाराज समाधी मंदिर परिसर गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर पूर्णपणे भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणाने फुलून गेला होता. ग्रामस्थ मंडळ बेलोशी आणि श्री संत दत्तात्रय कळंबे महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या शुभमुहूर्तावर विविध धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध

महाबळेश्वर-मेढा (केळघर घाट ) रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क  केळघर : महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-मेढा-सातारा-धामणेर या राज्य मार्ग क्रमांक १४० वर असलेल्या केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरामध्ये डोंगर उतारावरून वारंवार मोठ्या प्रमाणात दरड, दगड आणि माती रस्त्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता अन् संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आज,

केळघर घाटात काळ्याकड्यावर दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प :मदतकार्यादरम्यान जेसीबीवरच दगड पडले, चालक बचावला

पांचगणी न्यूज नेटवर्क ​केळघर : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर आणि परिसर अक्षरशः झोडपून निघाला आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका वाहतुकीला बसला असून, आज सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावरील केळघर घाटात ‘काळ्याकड्या’नजीक डोंगराची भलामोठी दरड कोसळल्याची घटना घडली. दरडीसोबत आलेला मोठा दगड-मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक

उन्नती फिनसर्व्ह व उत्कर्ष पतसंस्थेची उल्लेखनीय घोडदौड; सभासदांचा विश्वास हेच यशाचे गमक

पाचगणी न्यूज नेटवर्क  करहर : पारदर्शकता, तत्पर सेवा आणि ग्राहकांच्या भक्कम विश्वासाच्या बळावर ‘उन्नती फिनसर्व्ह’ आणि ‘उत्कर्ष को-ऑप क्रेडिट सोसायटी’ यांनी सहकार व वित्तीय क्षेत्रात आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे संस्थापक हनुमंत रांजणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित रांजणे यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे संस्थेने प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला

धरणग्रस्ततेचा शाप पुसून समृद्धीकडे घोडदौड: विभागीय मूल्यमापन समितीकडून ‘कावडी’च्या ग्रामविकासाचे भरभरून कौतुक!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​करहर : उशाला हातगेघर धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि सभोवताली हिरव्यागार डोंगररांगांची सुंदर निसर्गचौकट लाभलेल्या जावळी तालुक्यातील कावडी गावाने धरणग्रस्तांच्या वेदनांवर मात करत समृद्धीचा एक नवा आदर्श उभा केला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियाना’त सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर, विभागीय मूल्यमापन समितीच्या पाहणीदरम्यान या गावाने आपल्या लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक विकासाचा दणदणीत

सामाजिक बांधिलकीतून चिमुरड्यांना मदतीचा हात! सोनाई शिक्षण सेवाभावी संस्थेकडून विविध गावांतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क ​करहर : नवीन शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून सोनाई शिक्षण सेवाभावी संस्था, वालुथ यांच्या वतीने परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे थेट वाटप करण्यात आले. “भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि आपल्या भुकेतील दोन घास इतरांना देणे ही संस्कृती,” हाच उदात्त विचार डोळ्यांसमोर ठेवून