
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली मदत हीच खरी समाजसेवा – लक्ष्मीताई कऱ्हाडकर: मराठी शाळेतील मुलांना. शूजचे वाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली मदत हीच खरी समाजसेवा आहे, असे प्रतिपादन पाचगणीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी केले. पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १ व २ मधील तब्बल ३६० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रलच्या












