पांचगणी

बिलिमोरिया हायस्कूलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा सुरू; ३६६ विद्यार्थ्यांचा सहभाग

पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : येथील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘ओव्हर द बोर्ड चेस स्पर्धा २०२६-२७’ आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाविषयीची आवड वाढविणे, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करणे या उद्देशाने आयोजित या दोन दिवसीय स्पर्धेत तालुक्यातील २२ नामांकित शाळा व बुद्धिबळ अकादमींमधील तब्बल ३६६ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ​स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पियुष

पाचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्लोबल वॉर्मिंग, सोशल मीडियाचे प्रभाव, मानसिक आरोग्य आणि आर्थिक साक्षरता अशा विविध आधुनिक व सामाजिक विषयांवर आपली मते प्रभावीपणे मांडली. ​स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. या प्रसंगी सौ. स्वाती

​’दोन दशकांचा अतुट विश्वास: ‘कित्तूरकर डेंटल क्लिनिक’ आता नव्या अत्याधुनिक वास्तूत!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी / प्रमोद रांजणे यांजकडून…………….. ​शहरातीलच नव्हे तर राज्यभरातील दंत रुग्णांना गेली वीस वर्षे दर्जेदार सेवा देणाऱ्या कित्तूरकर डेंटल क्लिनिकच्या नवीन व अत्याधुनिक वास्तूचे उद्घाटन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यनिमित्ताने…

​’अवंतिका’ जिल्हा असेंब्लीत पाचगणी इनर व्हील क्लबचा डंका; अध्यक्षा अंजना पारठे यांना ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून महाबळेश्वर-पाचगणी परिसरासह सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘इनर व्हील क्लब ऑफ पाचगणी’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्लबच्या अध्यक्षा सौ. अंजना राजेंद्र पारठे यांच्या गतिमान नेतृत्वाची जिल्हास्तरावर दखल घेतली गेली असून, त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. पुणे

भोसे मारहाणीत मृत्यू प्रकरण: पाचगणी पोलिसांची धडक कारवाई, २४ तासांत चारही आरोपींना बेड्या; १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी!

पाचगणी (प्रतिनिधी): पांचगणी : दारूच्या नशेत घरात डोकावून पाहिल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून करणाऱ्या चारही संशयित आरोपींना पाचगणी पोलिसांनी अवघ्या ७ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. भोसे खिंड येथील ‘अतिथी’ हॉटेल परिसरात ही खळबळजनक घटना घडली होती. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ​अक्षय रमेश जाधव (वय

पावसाळ्यात पर्यटकांना नो एन्ट्री! पाचगणी-महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे पुढील ५ दिवस पूर्णपणे बंद; आदेश मोडल्यास कडक कारवाई; सपोनी दिलीप पवार यांचा इशारा

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ आणि ‘रेड’ अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस व तालुका प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. संभाव्य अतिवृष्टी आणि आपत्तीचा धोका लक्षात घेऊन वाई उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या पाच दिवसांच्या

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पांचगणी पोलिसांचा बडगा; घोडे रस्त्यावर मोकळे सोडल्यास होणार कायदेशीर कारवाई!

पांचगणी न्यूज नेटवर्क  पांचगणी : हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी आणि टेबल लँड परिसरात मोकळे फिरणारे घोडे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सार्वजनिक रस्ते, मोकळी मैदाने आणि पर्यटनस्थळांवर घोड्यांना चरण्यासाठी अथवा मुक्तपणे सोडणाऱ्या घोडे व्यावसायिकांना पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी

इनर व्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट आयएसओपदी स्वाती महेश बिरामणे यांची निवड!

पाचगणी न्यूज नेटवर्क  पाचगणी : पदे अनेकांना मिळतात; मात्र आपल्या नि:स्वार्थ कार्याने समाजाच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे व्यक्तिमत्त्व विरळाच असते. सातत्याने समाजसेवा, गरजूंना मदतीचा हात, शिक्षणाची ज्योत आणि महिला सक्षमीकरणासाठी आपले आयुष्य वाहिलेल्या पाचगणी येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्त्या स्वाती महेश बिरामणे यांच्या कार्याचा एक मोठा गौरव झाला आहे. त्यांची प्रतिष्ठित अशा ‘इनर व्हील क्लब’च्या डिस्ट्रिक्ट

जावळी तालुक्यातील काटवलीत मुसळधार पावसाने घर कोसळले; बेलोशे कुटुंब बेघर, ३ लाखांचे नुकसान!

पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी  : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जावळी तालुक्याला झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका काटवली गावाला बसला असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक ग्रामस्थ तुकाराम श्रीपती बेलोशे यांचे राहते घर पूर्णपणे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.   ​घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याने बेलोशे यांचे कुटुंब

पाचगणीत पावसाचे थैमान! शॉपिंग सेंटरच्या आवारातील भलामोठा सिल्व्हर ओकचा वृक्ष कोसळला; दोन वाहने चिरडली, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी  : पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी शहरात मुसळधार पावसाने प्रचंड थैमान घातले असून, शहरात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले आहे. यातच आज दुपारी पाचगणी येथील प्रसिद्ध शॉपिंग सेंटरच्या आवारात, ‘हॉटेल फ्रेंड्स ट्रीट’ समोर असलेला एक भलामोठा सिल्व्हर ओकचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याची खळबळजनक घटना घडली. हा वृक्ष थेट उभ्या असलेल्या