
‘गाव तेथे शाखा’ अंतर्गत पहिला मान रिटकवली ने पटकवला
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गाव तेथे शाखा उपक्रम सुरु केला आहे त्या उपक्रमाचा पहिला मान रिटकवली गावाने मिळवला.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जावळी तालुक्यातील पहिल्या गाव शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. जावळी तालुक्यात शेव चिवड्याचं गाव म्हणून ओळख असलेलं रिटकवली येथे झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे











