
शिक्षकी पेशाला काळिमा! वाईत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; आरोपीला अटक
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली असून, मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. खावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांनी एका विद्यार्थ्याला










