Home » मुंबई » इन्व्हेस्टेबल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या शाखेचे कोपरखैरणे येथे दिमाखात उद्घाटन; आधुनिक बँकिंगसह ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य!

इन्व्हेस्टेबल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या शाखेचे कोपरखैरणे येथे दिमाखात उद्घाटन; आधुनिक बँकिंगसह ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​नवी मुंबई (प्रतिनिधी): विश्वासार्हता आणि आधुनिक बँकिंग सेवांच्या जोरावर अल्पवधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘इन्व्हेस्टेबल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या नवीन शाखेचे उद्घाटन कोपरखैरणे येथे नुकतेच अत्यंत उत्साहात पार पडले. नवी मुंबईतील नामांकित नगरसेवक संदीप म्हात्रे यांच्या शुभहस्ते या भव्य शाखेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी बेलोशे, उपाध्यक्ष शशिकांत बेलोशे, सचिव शंकर धनवडे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​उद्घाटक म्हणून बोलताना नगरसेवक संदीप म्हात्रे यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. ते म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक युगात सहकार क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणे आव्हानात्मक आहे. मात्र, इन्व्हेस्टेबल क्रेडिट सोसायटीने आपल्या पारदर्शक कारभाराने आणि आधुनिक सुविधांनी ग्राहकांचे मन जिंकले आहे. कोपरखैरणे सारख्या गजबजलेल्या आणि प्रगतीशील विभागात ही शाखा सुरू झाल्याने स्थानिक व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल. संस्थेने भविष्यात याहूनही मोठी आर्थिक झेप घ्यावी आणि सभासदांचे हित असेच जोपासावे,” अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

​संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी बेलोशे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या यशस्वी प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “केवळ ४०० सभासद आणि १० लाख रुपयांच्या अल्प भांडवलावर सुरू झालेला आमचा हा प्रवास आज एका मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे. ग्राहकांच्या अखंड विश्वासामुळे आज संस्थेचे ३००० हून अधिक सभासद असून, संस्थेने १२ कोटी रुपयांचा समिश्र व्यवसाय यशस्वीरित्या पार केला आहे. नवी मुंबई आणि ठाणे कार्यक्षेत्र असणाऱ्या आपल्या संस्थेने नेहमीच सभासदांना केंद्रस्थानी मानले आहे. मोबाईल बँकिंग, जलद कर्ज मंजुरी यांसारख्या अत्याधुनिक सेवा पुरवून आम्ही राष्ट्रीयीकृत बँकांच्या तोडीस तोड सुविधा देत आहोत आणि पुढेही हा दर्जा कायम राखू.”

​नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेने नेहमीच ग्राहकांच्या गरजा ओळखून सेवा दिली आहे. कोपरखैरणे येथील नवीन शाखेमुळे ग्राहकांना अधिक गतीने आणि थेट सेवा मिळणे सुलभ होणार आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव शंकर धनवडे यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवरांनी नूतन शाखेला आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers