
पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन समृद्ध राज्यांत तब्बल ६४ शाखांचे भक्कम जाळे विणणाऱ्या अग्रेसर ‘उन्नती व उत्कर्ष’ आर्थिक परिवारांतर्गत येत असलेल्या उन्नती फिनसर्व्ह व उत्कर्ष को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ‘करहर’ शाखेचा नव्या वास्तूतील स्थलांतर व उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या या नव्या वास्तूचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक मा. श्री. हनुमंतराव रांजणे साहेब यांच्या शुभहस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
ग्रामीण भागाचा भौगोलिक आवाका लक्षात घेता, अत्यंत अल्प कालावधीत करहर शाखेने तब्बल १५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करून एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. या यशाचा गौरव करत संस्थापक हणमंतराव रांजणे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, “ग्रामीण भागातील जनतेने आणि सभासदांनी संस्थेवर दाखवलेला हा विश्वास कौतुकास्पद आहे. ग्राहकांना आधुनिक, तत्पर आणि पारदर्शक सेवा पुरवण्यासाठी आमचा परिवार कटिबद्ध असून, नव्या वास्तूच्या माध्यमातून भविष्यात अधिक प्रभावी व ग्राहकाभिमुख आर्थिक सेवा दिल्या जातील.”
या सोहळ्यास संस्थेच्या संचालिका सौ. सोनाली रांजणे, अध्यक्ष श्री. सुशील गोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव मानकुंमरे, उपसभापती गोरखबाबा महाडीक, नितीन गावडे सर, निकम सर, हाडवैद्य (स्वामी) दिलीप गोळे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, मारुती रांजणे, शिवाजी रांजणे, किरण जांभळे, वसंतराव बेलोशे, गोपाळ बेलोशे, के. डी. पवार, शामराव भिलारे, माजी मुंबई पोलीस एकनाथ मानकुमरे, अशोक पवार, डॉ. सतीश रहाटे, डॉ. प्रदीप यादव, पांडुरंग शिंदे, संतोष गावडे व माजी सरपंच हनुमंत रांजणे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमा दरम्यान परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी, सभासद आणि पतसंस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उद्योजक राहुल कदम, सुशील गोळे, समीर ढमाळ, सर्जेराव गावडे, उत्तम रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, सुधाकर देवघरे,चंद्रकांत बेलोशे सर, सुनील यादव,दत्ता यादव सर, विजय बेलोशे,ज्ञानेश्वर बेलोशे, दीपक बेलोशे, आनंदराव जगताप, संजय गोळे आदी उपस्थित होते यावेळी विक्रम चोरट व सागर बेलोशे यांनी सर्वांचे आभार मानले.
नूतन वास्तूमधील अद्ययावत सुविधांमुळे करहर आणि परिसरातील शेतकरी व व्यावसायिकांना अधिक सुलभ बँकिंग सेवा मिळणार असल्याने उपस्थितांनी उन्नती व उत्कर्ष परिवाराच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



