आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बदनामीकारक पोस्टमुळे करहर परिसरात संतापाची लाट; दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांना दिले निवेदन
पांचगणी न्यूज नेटवर्क करहर : लोकप्रिय नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबाबत सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी बदनामीकारक आणि अक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद करहर परिसरात उमटले असून, शिवेंद्रसिंहराजे प्रेमी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या अनुचित प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी करहर येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते…