Home » पाटण » कोयना धरण सहा वक्री दरवाजे एक फुट वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडले. : कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ६,१२९ क्युसेक्स विसर्ग. : कोयना धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा.

कोयना धरण सहा वक्री दरवाजे एक फुट वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडले. : कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ६,१२९ क्युसेक्स विसर्ग. : कोयना धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा.

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाटण दि. ३० ( प्रतिनिधी ) कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला दमदार पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व सध्याचा उपलब्ध ८४.७७ टीएमसी पाणीसाठा यापुढे २०.४८ टीएमसी शिल्लक पाणी साठवण क्षमता आणि सध्या प्रतिसेकंद सरासरी २५,२९३ क्युसेक्स आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून त्यातून ५,०७९ व धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून १०५० असे एकूण ६,१२९ क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यासह पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पडणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावं, लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. याशिवाय धरणात ज्या पटीत पाण्याची आवक वाढेल त्यादृष्टीने येणाऱ्या काळात पूर्वेकडे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन कोयना सिंचन विभागाकडून करण्यात आली आहे.

कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी २५,२९३ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणात सध्या उपलब्ध ८४.७७ टीएमसी तर उपयुक्त ७९.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. १ जूनपासून आत्तापर्यंतचा पाऊस कोयना २७९० मिलिमीटर, नवजा ३३६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत धरणात १.७९ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ २०.४८ टीएमसी पाण्याची गरज आहे.सध्या धरण ८०.५४ टक्के भरले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers