कोयना धरण सहा वक्री दरवाजे एक फुट वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडले. : कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ६,१२९ क्युसेक्स विसर्ग. : कोयना धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा.
पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण दि. ३० ( प्रतिनिधी ) कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला दमदार पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व सध्याचा उपलब्ध ८४.७७ टीएमसी पाणीसाठा यापुढे २०.४८ टीएमसी शिल्लक पाणी साठवण क्षमता आणि सध्या प्रतिसेकंद सरासरी २५,२९३ क्युसेक्स आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून…