Home » कराड » खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

 

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड  ः येथील एका प्राध्यापकाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची अन्‌‍ त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामीची धमकी देत त्यांना तीन लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या प्रकरणी शहर पोलीसात दोन महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद प्रा. अर्जुन भिंगारे (वय 56, रा. श्री साई प्रसाद कॉलनी, बनवडी रोड, विद्यानगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

अश्विनी वेताळ आणि शबाना मुल्ला अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रा. अर्जुन भिंगारे एका प्रतिष्ठीत महाविद्यालयात आहेत. चार सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास ते त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी तेथे अश्विनी वेताळ व शबाना मुल्ला मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या कामासाठी आल्या होत्या. कार्यालयातील लिपीक बाहेर गेल्याने प्रा. भिंगारे क्लार्कच्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी चष्मा घातलेल्या महिलेने बोनाफाइड सर्टिफिकेटची मागणी केली. संबंधित क्लार्क बाहेर गेले आहेत. ते आल्यावर काम होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर महिलांनी तुम्ही इथे कशाला बसला  असे म्हणत अरेरावी केली. त्यानंतर त्या तेथून निघून गेल्या.

त्या घटनेनंतर शनिवारी दि. 5 रोजी शहर पोलिसांनी प्रा. भिंगारे यांना पोलीस ठाण्यात तक्रार आल्याचे सांगून बोलावले. प्रा. भिंगारे तेथे गेले त्यावेळी महाविद्यालयात त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या दोन्ही महिला तेथे होत्या. तेथे समोपचाराने मार्ग काढण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर चर्चा सुरू असताना अश्विनी वेताळ व शबाना मुल्ला यांनी प्रा. भिंगारे यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यांच्या सततच्या त्रासाला आणि तीन लाखांच्या खंडणीच्या धमकीला कंटाळून प्रा. भिंगारे यांनी अखेर शहर पोलिसांत दोन्ही महिलांविरुद्द फिर्याद दिली आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers