सातारा सायन्स कॉलेज हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार: रेक्टर व कमिटीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; प्राचार्य, रेक्टरसह कमिटीवर गुन्हा दाखल
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : येथील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (वायसीआयएस) कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. हॉस्टेलमधील अपुऱ्या सुविधा आणि रेक्टरकडून होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवणे एका १८ वर्षीय तरुण विद्यार्थिनीच्या जीवावर बेतले आहे. रेक्टर जयश्री जकाते आणि हॉस्टेल कमिटी सदस्यांनी पोलीस तक्रार करण्याची तसेच कॉलेजमधून काढून टाकण्याची…