Home » पांचगणी » देशी गोवंश कत्तलीला देण्यापेक्षा गोशाळेत दान करा; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांचा स्तुत्य पुढाकार! वेळे येथील ‘करुणा मंदिर’मध्ये गोवंश सुपूर्द

देशी गोवंश कत्तलीला देण्यापेक्षा गोशाळेत दान करा; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांचा स्तुत्य पुढाकार! वेळे येथील ‘करुणा मंदिर’मध्ये गोवंश सुपूर्द

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी, ता. ३ : “देशी गोवंश कत्तलीसाठी देण्यापेक्षा तो गोशाळेत दान केला पाहिजे. गाईचे रक्षण केल्याने मिळणारे पुण्य अगाध आहे,” असा संदेश पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. याच विचारधारेतून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी पुढाकार घेत देशी गोवंश वेळे (ता. वाई) येथील ऐतिहासिक ‘करुणा मंदिर’ गोशाळेत दान करत एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

​या उपक्रमाची सविस्तर माहिती धारकरी बिरामणे यांनी दिली. त्यानंतर धारकरी सिद्धार्थ लाखे, अविनाश रांजणे, धीरज बेलोशे, यश गायकवाड, गाडी मालक अक्षय पोफळे, किरण कदम आणि अनिकेत ननावरे यांनी तत्परतेने हा गोवंश वेळे येथील करुणा मंदिर संस्थेकडे सुपूर्द केला. गेल्या अनेक दशकांपासून अत्यंत निष्ठेने आणि सेवाभावाने गोवंशाचे संगोपन व रक्षण करणारी संस्था म्हणून ‘करुणा मंदिर’ परिचित आहे. तेथे या गोवंशाची पूर्ण जबाबदारीने देखभाल केली जाणार आहे.

​आपली सख्खी आई आणि गोठ्यातील गाय या दोन्ही समान पूजनीय असतात. त्यामुळे त्यांचे मरेपर्यंत जतन आणि सेवा करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भविष्यात जर कोणत्याही शेतकऱ्याला अथवा पशुपालकाला आपला गोवंश दान करायचा असेल, तर त्यांनी तो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखान्याकडे न पाठवता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. धारकऱ्यांच्या या सामाजिक व धार्मिक संवेदनशीलतेचे आणि गोसेवा उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers